हंचिनाळ गावाच्या शिरपेचात अनखी एक मानाचा तुरा..IIT मध्ये मिळविला प्रवेश…सर्वत्र कौतुक..

राहुल मेस्त्री

जिद्द,मेहनत,कष्ट आणि चिकाटी हा मंत्र आत्मसात केला तर यश नक्कीच मिळते असे बोलले जाते.त्याचप्रमाणे बेळगाव जिल्ह्यातील एका छोटे गावा असलेले हंचिनाळ ता.निपाणी येथील नितिन तात्यासो कांबळे यांचे चिरंजीव रुषिकेश नितीन कांबळे यांना थेट मध्येप्रदेश मधील भोपाळ या ठिकाणी (IIT)Indian institute of information technology Bhopal येथे प्रवेश मिळाला आहे.

त्यामुळे रुषिकेशचे हंचिनाळ आणि परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.. रुषिकेशचे प्राथमिक शिक्षण हंचिनाळ येथील सरकारी शाळेमध्ये झाले. व माध्यमिक शिक्षण बेनाडी येथील काडशिदेश्वर हायस्कूल मध्ये झाले. त्यानंतर 11 वि 12 वि शिक्षण हे निपाणी येथील बागेवाडी काॅलेज मध्ये झाले असुन त्यानंतर त्यांना IIT मध्ये प्रवेश मिळाला.आणि पुढील शिक्षणासाठी ते भोपाळ येथे रवाना झाले.

या मिळालेल्या यशाबद्दल हंचिनाळ येथील बौद्ध समाजाच्या वतीने रुषिकेशचा सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांनी कृतज्ञता व्यक्त करुन बोलताना म्हणाले या जगात अशक्य असे काही नाही. आपले ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल केली की यश निश्चित मिळते.

यावेळी बाळासो कांबळे व सिध्दार्थ कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सागर कांबळे, शिवाजी वराळे, विक्रम ढाले, साजन घस्ते ,कुमार कांबळे,महादेव कांबळे, सिध्दार्थ जिरगे, विनोद माळी, दिपक कांबळे, रवी कांबळे, आनंदा वराळे,सचिन ढाले, गोपाळ कांबळे, विलास कांबळे,आनंदा चौगुले आदी उपस्थित उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here