नेर्ली गावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा – प्रतीक सुतार…

कोल्हापूर – राजेद्र ढाले

नेर्ली गावचे सुपुत्र प्रतीक प्रकाश सुतार यांची चिंचणी पालघर येथे झालेल्या रस्सीखेच स्पर्धीमध्ये गोल्डमीडल मिळुन गावचे नाव लौकिक केल्याबद्दल नेर्लीगावच्या वतिने जंगी नागरी सत्कार सह वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली त्यानें आपल्या या स्पर्धेमध्ये दोन गोल्डमीडल मिळुन आपले कर्तुत्व सिध्द केले आहे.

या स्पर्धेसाठी रस्सीखेच संघटनेचे अध्यक्ष माधवी विभीषण पाटील व प्रशिक्षक अक्षय पाटील(टीटवे)व विभीषण पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले यावेळी गावातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here