लीफ फिनटेकद्वारे लकी ड्रॉ विजेत्यांची घोषणा…

मुंबई – लीफ फिनटेक या सुलभरित्या उपलब्ध होणाऱ्या आणि किफायतशीर गृहकर्जांद्वारे भारतामध्ये परवडण्याजोग्या विभागातील घरे खरेदी करण्याचा वेग वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या मुंबईस्थित फिनटेक कंपनीने नववर्ष लकी ड्रॉ विजेत्यांना ५००० रुपये किंमतीची बिग बास्केट शॉपिंग व्हाउचर्स बक्षीस म्हणून दिली आहेत. हा ड्रॉ लीफ फिनटेकच्या ग्राहक संवाद कार्यक्रमाचा भाग होता.

लीफ फिनटेक आपल्या सेवा ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण विस्तृत वर्गांना देते, विशेषत: अनौपचारिक उत्पन्न विभागातील ग्राहकांना कंपनी सेवा देते. कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञान सोल्यूशन्स, क्रेडिट अल्गोरिदम्स आणि औपचारिक बँकिंग वित्तपुरवठ्याद्वारे अद्याप फारशा सेवा न दिल्या जाणाऱ्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आहे.

लीफ फिनटेकचे सीईओ मिलिंग गोवर्धन म्हणाले, “कंपनी आणि ग्राहकांमध्ये एक संसाधनपूर्ण बंध निर्माण करण्यासाठी ग्राहकाचा सहभाग अत्यावश्यक आहे. लीफ फिनटेकमध्ये आमचे काम घर खरेदी करणाऱ्यांना वित्तपुरवठा करून त्यांच्या इच्छांना वास्तव रूप देणे एवढेच नाही, तर त्यांच्याशी संवाद साधून दीर्घकाळ टिकणारे नाते निर्माण करणे हेदेखील आहे.

आपले घरखरेदीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमची निवड करणाऱ्या ग्राहकांपैकी काही ग्राहकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा लकी ड्रॉ हा एक मार्ग आहे. भविष्यकाळातही आम्ही अशाच प्रकारचे कल्पक ग्राहक संवाद कार्यक्रम घेतच राहू.”

आपल्या नवोन्मेषकारी आणि कार्यक्षम वित्तपुरवठा प्रणालीच्या माध्यमातून, लीफ फिनटेकने १०,००० हून अधिक आयुष्ये बदलली आहेत. कंपनीच्या एनसीआर (दिल्ली राजधानी परिसर), राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांमधील शहरांमध्ये ३५ हून अधिक शाखा आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here