स्टडी ग्रुपद्वारे विद्यार्थ्यांकरिता एकत्रित व्हिसाची घोषणा…

विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैशांच्या बचतीसाठी अॅबर्डीन युनिव्हर्सिटी आणि स्टडी ग्रुपची सुविधा…

मुंबई – अॅबर्डीन युनिव्हर्सिटी आणि स्टडी ग्रुपच्या युनिव्हर्सिटी ऑफ अॅबर्डीन इंटरनॅशनल स्टडी सेंटरने एकत्रित भागीदारीतून संबंध दृढ करण्याची घोषणा केली. याद्वारे २०२१ आणि त्यानंतर इंटरनॅशनल ईयर २ किंवा प्री-मास्टर्स प्रोग्राम्समध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन एकत्रित व्हिसा मिळू शकेल.

एकत्रित व्हिसाद्वारे विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा वाचेल. तसेच त्यांचा अभ्यासक्रम आणि सिंगल व्हिसासह युनिव्हर्सिटीची डिग्री घेताना युनिव्हर्सिटी कँपससमध्ये त्यांच्या आवडती डिग्री घेताना अनेक बदलांचा अनुभव घेता येईल.

व्हिसाद्वारे युकेव्हीआयसाठी शैक्षणिक आयईएलटीएसकरिता पर्याय मिळतात. याद्वारे स्टडी ग्रुपच्या युनिव्हर्सिटी ऑफ अॅबर्डीन इंटरनॅशनल स्टडी सेंटरला प्रवेश घेता येईल. यात ड्युओलिंगो, इंडियन XII स्टँडर्ड आणि पिअर्सनचाही समावेश असेल. युकेमध्ये असताना विद्यार्थी आठवड्याला २० तास काम करू शकतील.

जेणेकरून त्यांचा सीव्ही अधिक चांगला करू शकतील आणि कोर्स सुरु असतानाच अनुभवाची संधी मिळेल. स्टडी ग्रुप इंटरनॅशनल स्टडी सेंटर प्रोग्राम आणि अॅबर्डीन युनिव्हर्सिटीतील निवडलेल्या डिग्री दरम्यान नव्या व्हिसासाठी अर्ज करताना, पदवी जॉइन करण्यापूर्वी किंवा घरी परत जाण्यापूर्वी आयईएलटीएस टेस्ट देण्याची गरज नाही.

युनिव्हर्सिटी ऑफ अॅबर्डीन इंटरनॅशनल स्टडी सेंटरद्वारे अॅबर्डीन विद्यापीठात पदवीपूर्व आणि पदवीनंतरच्या अभ्यासक्रमास अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक नवे प्रोग्राम उपलब्ध करून देत आहे. याच्या तीन टर्ममधील इंटरनॅशनल ईयर टू प्रोग्रामद्वारे बिझनेस मॅनेजमेंट अँड फायनान्स, कंप्युटिंग सायन्स मधील चार वर्षांच्या पदवीपूर्व डिग्रीकरिता वेगवान तीन वर्षांचा मार्ग प्रदान करतात.

अंडरग्रॅज्युएट फाउंडेशन प्रोग्रामला प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेपेक्षा चांगली कामगिरी करणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा प्रोग्राम तयार करण्यात आला आहे. प्री-मास्टर्स प्रोग्राम हा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक ज्ञान अधिक सखोल करण्यासाठी तसेच इंग्रजी भाषा कौशल्य विकसित करण्यासाठीचा फास्ट-ट्रॅक १२ आठवड्यांचा कोर्स आहे. हा प्रोग्राम बिझनेस अँड लॉ तसेच सायन्स अँड इंजिनिअरिंग या दोन विषयांसाठी उपलब्ध आहे.

इंटरनॅशनल स्टडी ग्रुप सेंटरतर्फे इंटरनॅशनल ईयर टू किंवा प्री-मास्टर्स प्रोग्रामला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना £ २,५०० पर्यंत स्कॉलरशिप प्रदान केली जाते.  अॅबर्डीन विद्यापीठ पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिष्यवृत्तीही प्रदान करते.

अभ्यासक्रमाच्या प्रत्येक वर्षी ट्युशन फीमध्ये £ ५,००० ची सवलत याअंतर्गत मिळते. भारतात सर्वसाधारणपणे निवासी दर्जा असलेले स्वत: पैसा देणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत. म्हणजेच, स्टडी ग्रुपच्या इंटरनॅशनल स्टडी सेंटरच्या विद्यार्थ्यांना पदवीपूर्व लेवल प्रोग्रामसाठी £१२,५०० पर्यंत किंवा पोस्टग्रॅज्युएट लेवल प्रोग्रामकरिता £ ७,५०० पर्यंत शिष्यवृत्ती मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here