भाजप प्रदेशाध्यक्षांवर अण्णा संतापले…व्हिडिओद्वारे दिला ‘हा’ संदेश…

न्यूज डेस्क – समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी खडे बोल सुनावत एक व्हिडीओ संदेश आपल्या युटूब वरून प्रसारित केला असून यात अण्णांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला.

गेल्या आठवड्यात दिल्लीच्या भाजप प्रदेशाध्यक्षांनी अण्णा हजारे यांना पत्र पाठवून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात भाजपने पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते.

यावर हजारे यांनी लेखी पत्र पाठवून हे निमंत्रण नाकारताना भाजपला खडे बोल सुनावले होते. त्यानंतर आज हजारे यांच्याकडून एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याद्वारे पुन्हा एकदा गुप्ता यांना उत्तर दिले आहे. हे सुरू असताना सोशल मीडियाद्वारे हजारे यांच्यासंबंधी विविध मते व्यक्त होत होती. त्यांचाही हजारे यांनी समाचार घेतला आहे.

साभार- अण्णा हजारे यांच्या युटूब वरून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here