आकोट – संजय आठवले
महावितरणने शेतक-याना अवाच्यासवा दिलेल्या विज देयकात दुरुस्ती करणे व ऐन मोसमात शेतक-यांचा खंडित केलेला विज पुरवठा सुरळीत करणे या मागण्यांसाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने संतप्त शेतक-यानी आकोट महावितरण कार्यालयावर हल्लाबोल केला.
आकोट तालुक्याच्या ऊत्तरेकडिल सातपुड्याच्या पायथ्याचा भूभाग हा ओलीताचा भूभाग आहे. आज रोजी या परिसरात गहू, हरभरा, ऊस, भाजीपाला, भूईमूग, केळी, पपई, टोमॕटो आदी पिके शेत शिवारात डोलू लागली आहेत. या पिकाना पाणी देण्याच्या ऐन मोसमात महावितरणने शेतक-याना अंदाजाने अवाच्या सवा विज देयके दिली आहेत. अशी अंदाजावर आधारीत देयके अदा करण्यास शेतक-यानी नकार दिला.
त्यामूळे महावितरणने शेतक-यांचा विज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला. त्याला शेतक-यानी विरोध दर्शविला. यावर तोडगा काढण्यासाठी महावितरण अधिका-यानी नाराज शेतक-याचे म्हणणे ऐकण्यासाठी सौंदळा ता. तेल्हारा येथे बैठक आयोजित केली. या ठिकाणी शेतक-यानी आपले गा-हाणे मांडून विज बिल देयकात दुरुस्ती करण्यासाठी अधिका-याना विनंती अर्ज स्विकारण्याची विनंती केली.
परंतु ते अर्ज न स्विकारता वरिष्ठांशी चर्चा करतो असे सांगून महावितारणचे अधिकारी तेथून निघून गेले. या वर्तनाने शेतक-यांमध्ये संतापाची लाट ऊसळली. त्यामूळे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे राष्ट्रिय अध्यक्ष ललितदादा बहाळे, महिला आघाडी विदर्भ अध्यक्षा सौ. ज्योत्स्नाताई बहाळे, आकोट तालुका महिला अध्यक्षा सौ. प्रमिलाताई भारसाखळे, सतिश देशमुख, लक्ष्मीकांत कौठकर यांचे नेतृत्वात शेतक-यानी आकोट महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला.
या मोर्चेक-यांचे नेते ललीतदादा बहाळे व सतिश देशमुख यांचेशी कार्यकारी अभियंता अनिल ऊईके, अतिरिक्त कार्य. अभि. अनिल कराळे, ऊपकार्यकारी अभि. दिपक राठोड, सहा. अभियंता अजय वसु, अरुण जाधव तथा आकोट शहर ठाणेदार प्रकाश अहिरे, ग्रामिण ठाणेदार नितिन देशमुख यानी चर्चा केली. यावेळी कार्यकारी आभियंता अनिल ऊईके यानी विज बिल दुरुस्ती करुन देण्यास संमती दर्शविली.