यवतमाळात खासदार भावनाताई गवळी यांचा अपमान केल्याने संताप…शिवसैनिकांनी आमदार पाटणी यांचे पोस्टर्स चपलीने तुडविले…

यवतमाळ, सचिन येवले

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावनाताई गवळी यांचा कारंजा येथील भाजपाचे आमदार राजेन्द्र पाटणी यांनी अर्वाच्य भाषेत बोलून अपमान केला. महिला खासदाराचा झालेला अपमान यवतमाळच्या शिवसैनिकांना जिव्हारी लागला असून आज शिवसैनिकांनी आमदार राजेन्द्र पाटणी यांचे पोस्टर्स दत्त चौकात तुडविले. एवढेच नव्हे तर शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी आमदार पाटणी हे यवतमाळात आल्यास त्यांना भरचौकात बदडण्याचा इशाराच दिला आहे.

प्रजासत्ताक दिनी वाशिम येथे जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक नागरीक त्यांच्या समस्या घेऊन खासदार भावनाताई गवळी यांना भेटायला आले होते. या दरम्यान अनेक विकास कामात कारंजा येथील भाजपाचे आमदार राजेन्द्र पाटणी हे अडथळा निर्माण करीत असल्याचे समोर आले.

त्यामुळे जनतेच्या वतीने खासदार भावनाताई गवळी यांनी आमदार पाटणी यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पाटणी यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत भावनाताई गवळी यांचा अपमान केला. एवढेच नव्हे तर अनेक ठिकाणी बंद पाळून नागरीकांना सुध्दा वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. या अपमानाचे पडसाद आज यवतमाळात सुध्दा उमटले. स्थानिक दत्त चौकात शिवसैनिकांनी आमदार पाटणी यांच्या पोस्टर्सला चपलीने बदडले. त्यानंतर हे पोस्टर्स जाळण्यात आले.

याप्रसंगी संतोष ढवळे यांनी पाटणी यांना यवतमाळात आल्यास बदडण्याचा इशारा दिला आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख पिंटु बांगर यांनी सुध्दा महिला खासदाराचा अपमान सहन करणार नसल्याचे सांगत या घटनेचा निषेध केला आहे. याप्रसंगी शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटक मंदाताई गाडेकर यांनी सुध्दा आमदार पाटणी यांनी महिलेचा अपमान केल्यामुळे ते राक्षसी प्रवृत्तीचे असल्याची टिका केली. गुणवंत ठोकळ, अतुल गुल्हाणे यांनी सुध्दा सदर घटनेचा निषेध केला.

मराठा समाजाच्या वतीने लक्ष्मण गवळी यांनी निषेध केला. याप्रसंगी संतोष ढवळे, पिंटू बांगर, सुरेश ढेकळे, गुणवंत ठोकळ, वसंत जाधव, राजुभाऊ नागरगोजे, रवी राऊत, अतुल गुल्हाणे, संजय कोल्हे, अभिजीत पवार, संजय पाटील, नरेंद्र बाहेकर, विनोद आसकर, मंदाताई गाडेकर, काजल किरण कांबळे, शारदा थोटे, प्रतिभा राणे, दिनेश इंगळे, सुरेश चुनारकर, चंदू केळतकर, लक्ष्मण गवळी, कंटेश तायडे,

बाळासाहेब वाळस्कर, पराते सर, उरकुडे ताई, यादव ताई, पांडे ताई, आकाश जाधवर, भुषण काटकर, पवन शेंद्रे, संतोष सोनकुसरे, इरवे काका, पुडके काका, अनिकेत थोरात, नासिर भाई, रघु नक्षणे, सचिन नक्षणे, नितीन राऊत, डफळे ताई, दिपक सुकळकर, मनोज घोडमारे, ऋषभ आसकर, बापू डोळे, गोलू काळे, शेख सलाम, अक्षय पाखरे, पवन कुर्वे, राहुल आकळे, डॉ. प्रसन्न रंगारी, विषाल बन्सोड, रुषी इलमे, आशिष ढोले, सोनु बिसेन, प्रविण ठाकरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here