वाड्यातील अंगणवाडी सेविकेचा मारेकरी अखेर पोलिसांच्या ताब्यात…

वाडा – वार्ताहर

वाडा तालुक्यातील सापणे (खुर्द) येथील रहिवासी असलेल्या महिलेचा तिच्या घरात रात्रीच्या सुमारास घुसून तीक्ष्ण हत्याराने वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. दरम्यान अनेक संघटना व राजकीय पक्षाच्या वतीने या प्रकरणाचा निषेध करून आरोपीस अटक करण्याची मागणी केली होती.

शुक्रवार दि. ११जून २०२१ रोजी पहाटेच्या सुमारास मयत सुप्रिया गुरुनाथ काळे (वय ४५) ही आपल्या राहत्या घराचे हॉलमध्ये झोपली असतांना अज्ञात इसमांनी किचनच्या स्लाईडगीच्या खिडकी वाटे आत प्रवेश करून मयत हिच्या कानाच्या खाली धारदार हत्याराने वार करुन जिवे ठार मारुन तीचे कानातील सोन्याची कर्ण फुले, मंगळ सुत्र व एक मोबाईल असा एकुण ६२ हजार रुपयांंचा मुद्देमाल चोरुन नेला म्हणून वाडा पोलीस ठाण्यात चोरी व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे गाभीर्य लक्षात घेवुन दत्तात्रय शिंदे , पोलीस अधीक्षक, पालघर व प्रकाश गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, प्रशांत परदेशी, उपविभागिय पोलीस अधिकारी जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि आसीफ बेग, वाडा पोलीस ठाणे व पोउनि आशिष पाटील, स्थानिक गुन्हे शाखा बोइसर यांची वेगवेगळी तपास पथके तयार करुन , सदर पथकास तपासकामी सुचना व मार्गदर्शन करुन तपास पथके वेगवेगळ्या परिसरात रवाना केलेली होती.

सदर प्रकरणी कोणत्याही प्रकारचे धागेदोरे नसतांना कौशल्यपुर्ण गुन्ह्याचा तपास करुन पोउनि आशिष पाटील , स्थानिक गुन्हे शाखा , बोईसर व त्यांचे पथकाने सदर गुन्ह्यात एक आरोपीत वय ३५ वर्षे रा.कर्जुन, ता.वसई यास अटक करुन त्याची कसुन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुधीर संखे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here