अंगणवाडी कर्मचारी यांचा विविध मागण्यासाठी जिल्हा परिषदेवर आंदोलन…

अमरदिप बडगे
गोंदिया प्रतिनिधी

जिल्ह्यात आज अंगणवाडी व मदतनीस यांच्या विविध मागण्यासाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.यावेळी निकृष्ट दर्जाच्या मोबाईल प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून विशेष शासनाचे लक्ष वेधण्यात आले.आंदोलनाचे आयटकचे राज्य उपाध्यक्ष हौसलाल रहांगडाले, जिल्हा अध्यक्ष शकुंतला फटिंग, जिल्हा सचिव आम्रकला डोंगरे यांनी केले.

शासनाच्या वतीने १६आगष्ट प्रयत निर्णय न घेतल्यास १७ आगष्ट पासुन राज्य व्यापी मोबाईल वापसी आंदोलन व पोषण टकर कामबंद करण्याचा इशारा देण्यात आला.जुनाट मोबाईल क्षमता संपली असुन मोबाईल बरोबर काम करित नाही, बरेचसे समस्या मोबाईल मध्ये दिसून येत असल्याने दुरुस्ती चा खर्च अंगणवाडी कर्मचारीकडून वसुल केला जातो.

आयटक व अंगणवाडी कृती समितीने शासनाला वेळोवेळी निवेदने देण्यात आली परंतु दखल घेण्यात आली नसल्याने आंदोलन करावे लागत आहे.नविन दर्जाचे मोबाईल देण्यात यावे ज्यामुळे काम करण्यास अडचण येणार नाही.भत्यात वाढ करावी.रिक्त जागा लगेच भरावे.आदि मागण्यासाठी आयटक व अंगणवाडी कर्मचारी यांचा आंदोलन करण्यात आले.यावेळी जिल्ह्यातील अनेक अंगणवाडी कर्मचारी व मदतनीस आंदोलनात सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here