विनानंबर च्या डंपर ने बालकास चिरडले…बालकाचा जागीच मृत्यू…

बोदवड प्रतिनिधी (गोपीचंद सुरवाडे)

बोदवड कडून साळशिंगी कडे जाणार पिवळ्या रंगाचा विना नंबरच्या डंपर भरधाव वेगाने चालवून हर्षल गजानन ईधाटे वय चार वर्षे जोराने धडक देऊन त्याच्या डोक्यावरून डंपर चे चाक जाऊन त्याचे डोके चिरडल्या ने तो जागीच मयत झाला.

शांताराम हरी ईधाटे रा ,नेरी तालुका जामनेर हे मोटारसायकल लघवी लागल्याने रस्त्याचा कडेला लावून हर्षल यास उभे केले होते,हर्षल हा आजी आजोबा यांच्याकडे आला होता, सदरचे डंपर हे रेती खाली करून चालले होते,

बोदवड तालुक्यात अवैधरित्या रेती वाहतूक सर्रास दिवसा रात्री सुरू असते,एक जून रोजी रात्री 11 ते11 30 च्या दरम्यान ओहरलोड भरलेले रेतीचे डंपर रेल्वे च्या प्रवाशी प्रवेशद्वार मध्ये धडकला, यामुळे रेल्वे चे प्रवेशद्वार जवळील खांबाचे नुकसान झाले,

त्याचप्रमाणे पंधरा जून रोजी एका माल वाहतूक करण्याऱ्या एम पी 09 –0558 क्रमांक असलेल्या ट्रक मधून अवैधरित्या वाळू वाहतूक करताना महसूल विभागाने पकडला,तो ट्रक आज रोजी पोलीस स्टेशन च्या आवारात जमा आहे,

बुधवार दिनांक24 जून राजी एम एच –19 झेड -5001 नंबरचे हिरव्या पोपटी रंगाचे व एक विना नंबर पिवळ्या रंगाचे डंपर जमा केले होते त्यांना काहीएक कारवाई न करता सोडून देण्यात आले,

आधी डंपर पकडणे तहसील कार्यालय आवारात जमा करणे नंतर सोडून देने यामागचे गौडबंगाल काय आहे?बोदवड तालुक्यात अवैध गौण खनिज खुले आम महसूल विभागाच्या सूप

व पोलिसांच्या नाकावर टिच्चून विणानंबरच्या ट्रॅकटर मधून वाहतूक केली जाते, हा प्रकार नेहमीचा आहे,याकडे आर टी ओ विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here