मूर्तिजापूर | अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास उडविले…दुचाकीस्वार गंभीर

मूर्तिजापूर – अभिजीत दहिकर

पिंजर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर झाल्याची घटना सालासर लॉन जवळ १४ जानेवारी रोजी दुपारी ३:३० वाजताच्या दरम्यान घडली.
पिंजर – मूर्तिजापूर मार्गाने पंकज वाकोडे (३४) राहणार आरखेड हा दुचाकीस्वार एमएच २९ के ४६(शेवटचे दोन अंक अस्पष्ट) या क्रमांकाच्या दुचाकीने मूर्तिजापूरकडे येत असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला.

जखमी इसम हा बेशुद्ध अवस्थेत असुन त्याच्या मोबाईलला कोड लॉक असल्याने काही वेळ त्याच्या नातेवाईकांशी संपर्क होऊ शकत नव्हता नसल्याची जखमीला बेशुद्ध अवस्थेत येथील वंदेमातरम व वंचित बहूजन आपत्कालीन पथकाच्या मदतीने त्याला उपचारासाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. डोक्याला जोरदार दुखापत झाल्याने वृत्त लिहिस्तोवर सदर जखमी इसम बेशुद्ध अवस्थेत होता. पुढील उपचारासाठी त्याला अकोला येथे पाठविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here