मिरजेतील पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्‍यास मारहाण; कर्मचार्‍यांचे आंदोलन…

सांगली – ज्योती मोरे

मिरजेतील महापालिका पाणी पुरवठा विभागातील वाहन चालक विनोद  मगदूम यास एका इसमाकडून मारहाण झाल्याच्या निषेधार्थ पाणी पुरवठा विभागातील
कर्मचार्‍यांनी घडलेल्या प्रकाराचा व वरिष्ठांनी केलेल्या दुर्लक्षाचा निषेध व्यक्त करीत आंदोलन केले.

पाणी पुरवठा विभागातील वाहन चालक विनोद सत्याप्पा मगदूम यास एका इसमाने काही कारण नसताना मारहाण केली.या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. या
गोष्टीकडे  वरिष्ठांनी दुर्लक्ष केले. दुर्लक्ष केल्यानंतर महापालिका कामगार संघटनेने मारहाणीची माहिती आयुक्तांना दिली.

आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकारी पांडव यांना पोलिसांमध्ये फिर्याद देण्यास सांगितले. फिर्याद दिल्यानंतरही पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्‍यांनी वरिष्ठ अधिकारी पांडव यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले परंतु त्यांच्याकडून काहीही उतर मिळाले नाही.वरिष्ठांनी याबाबत दखल घ्यावी व तसेच शासकीय कर्मचार्‍यांना मारहाण करणार्‍या व्यक्तींवर कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणीही यावेळी कर्मचार्‍यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here