सांगली – ज्योती मोरे
काही दिवसांपूर्वी MSEB मधील कर्मचारी वीज ग्राहकांकडून बिलाची रक्कम घेऊन MSEB आॅफीस मध्ये जमा करीत नव्हते . त्याचा त्रास वीज ग्राहकांना होत होता. व त्यांची वीज कनेक्शन कट करण्यात आली होती. एम एस ई बी कर्मचाऱ्यांनी बिलाच्या रकमेचा अपहार केला होता.
त्याबाबतीत वीज ग्राहकांनी आमच्या कडे तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन.3-1-2022 ला MSEB कार्यकारी अभियंता,वीज वितरण कंपनी यांच्याकडे भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आले होते चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांच्या वर कारवाई करण्याची मागणी केली अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार एम एस ई बी ने चौकशी कमिटी नेमण्यात आली होती.
त्यानुसार चौकशी करून दोषी एमएसबी कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली. अजूनही कोणत्याही वीजग्राहकांची MSEB कर्मचाऱ्यांनी बिलाची रक्कम घेतली असतील व MSEB मध्ये जमा केली नसतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा त्यांना न्याय मिळवून दिला जाईल असे आवाहन दीपक माने यांनी केले आहे