हंचनाळ येथील आठ वर्षीय बालकाचा विहिरीत पडून मृत्यू ; परिसरात सर्वत्र हळहळ…

राहुल मेस्त्री

हंचिनाळ तालुका निपाणी येथे आठ वर्षीय बालकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. येथील नजीकच कोडी मळ्यात राहणारे कृष्णात उर्फ पिंटू घाडगे यांचा मुलगा वेदांत कृष्णात घाटगे वय वर्ष 8 हा घरा शेजारी असलेल्या शेतामध्ये खेळत असताना तुडुंब भरलेल्या विहिरीत पडल्याने या 8 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे.

यामुळे हंचिनाळ गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे .याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी वेदांत हा आपल्या आतिचा मुलगा प्रज्वल वय वर्ष 8 याच्यासोबत येथील कोडी मळ्यातील थोड्याअंतरावर सुंदर जाधव यांच्या शेतात असलेल्या विहीरी नजिक दिनांक 12 रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान वेदांत आणि प्रज्वल हे दोन बालक त्या ठिकाणी मोटर सायकलच्या चाकाने खेळत असताना तुडुंब भरलेल्या विहिरीत वेदांत पडला.

पाण्यात पडल्यामुळे त्याच्या सोबत खेळत असणाऱ्या प्रज्वलच्या लक्षात आल्यानंतर त्याने आपल्या घराच्या दिशेने धाव घेऊन घडला प्रकार घरातील नागरिकांना सांगितला.. तोपर्यंत फार उशीर झाल्याने वेदांत पाण्यात बुडाला होता.ही घटना नातेवाईकांनी निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात कळवल्यानंतर कॉन्स्टेबल अमर चंदनशिव कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली.

रात्री उशीर झाल्याने दुसऱ्या दिवशी दिनांक 13 रोजी गावातील तरुणांच्या मदतीने शोधमोहीम करून वेदांतचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. सदर मृतदेहाचे शवविच्छेदन निपाणी येथील शासकीय गांधी इस्पितळात करून नातेवाईकांच्याकडे मृतदेह देण्यात आला .यावेळी आडी मंडल पंचायत अध्यक्ष बबन हवलदार, ग्रामपंचायत सदस्य एम वाय हवालदार यांनीदेखील पाहणी केली…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here