Saturday, June 15, 2024
spot_img
Homeराज्यशेतकरी बांधवांसाठी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचे कडून आवाहन...

शेतकरी बांधवांसाठी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचे कडून आवाहन…

अकोला – संतोषकुमार गवई

शेतकरी बांधवांनो सध्या बाजारात बीटी कपाशीच्या एका विशिष्ट बियाण्याची मागणी व पुरवठ्यातील तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कृषी केंद्राकडे मोठी गर्दी होत आहे .तसेच अकोला जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रधारक यांच्याकडे त्या विशिष्ट वाणांच्या बियाण्याचा साठा संपला असल्याचे लेखी पत्र जिल्हा कृषी व्यावसायिक संघाकडून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला यांना प्राप्त झाले आहे .

शेतकरी बांधवांनी कपाशीच्या एकाच विशिष्ट वाणाचा आग्रह न धरता बाजारात उपलब्ध असणाऱ्या समतुल्य वाणांची निवड करावी. सध्या बाजारात इतर कंपन्यांचे लवकर येणारे, मोठ्या बोंडाचे व अधिक उत्पन्न देणारे बरेच वाण विक्री करिता उपलब्ध आहेत.

म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला यांच्याकडून कापूस उत्पादक शेतकऱरी बांधवाना आवाहन करण्यात येते की अपेक्षित असलेले एका कंपनीचे विशिष्ट वाणाचा आग्रह न धरता इतर समतुल्य असणाऱ्या पर्यायी वाणांची निवड करावी व यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करावा.

Santoshkumar Gawai
Santoshkumar Gawaihttp://mahavoicenews.com
मी संतोषकुमार गवई पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या ३२वर्षापासून कार्यरत आहे.सकारात्मक विचार मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतो म्हणून no negative only & only positive news यावरच माझा विश्वास आहे.संपुर्ण देशात सर्वप्रथम कारगील युध्दाचा 'आँखो देखा हाल'मांडता आला. शोध पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या घटना घडामोडी 'महाव्हाईस 'डिजिटल माध्यमातून समाजासमोर मांडणे हे माझ ध्येय आहे... संतोषकुमार गवई अकोला- 9689142973/9860699890
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: