तुम्ही मर्द असाल तर देवेन्द्रजींना टार्गेट करा…अमृता फडणवीस यांच नवाब मलिकांना प्रत्युत्तर…

फोटो- सौजन्य गुगल

न्यूज डेस्क – राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आज पत्रकार परिषेद घेत राष्ट्रवादीचे नेते तथा अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्यावर थेट हल्ला केलाय, मी राजकारणी नाही, मी समाजसेविका आहे असे माझ्या नादाला लागू नका, माझ्या अंगावर आलेल्यांना मी सोडणार नाही असेही अमृता फडणवीस यावेळी म्हणाल्या

मी मुंबईतील नद्यांसाठी गाणे गायले त्यासाठी मुंबई रिव्हर मार्च संस्थने मला संपर्क साधला महाराष्ट्रातील नद्यांना नालं बोलणं लज्ज्यास्पद असेही त्या वेळी म्हणाल्या वेळी त्या बोलत होत्या. या ग्रुपला मी देवेंद्र फडणवीसांकडे घेऊन आले आहे. ईशा फाऊंडेशनने त्यांना घेतलं म्हणून आम्ही घेतलं. तेव्हा जयदीप राणाचा पंटरचा काही रेकॉर्ड नव्हता. त्यानंतर आपण लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे, असं मनात आलं. आम्ही सदगुरू जग्गी वासूदेव यांच्याशी जोडलो गेलो. त्यांच्या ईशा फाऊंडेशनसाठी एक नदी वाचवण्याबाबतचं गाणं तयार केलं गेलं, असंही त्यांनी सांगितलं.

या गाण्यात बॉलिवूडचे अनेक कलाकार सहभागी झाले. मीही झाले. देवेंद्र फडणवीसही झाले. त्यानंतर रिव्हर मार्चनेही आमच्यासाठी एक गाणं बनवा, असं त्यांना सांगितलं. सचिन गुप्तांनी त्याला होकार दिला. त्यानंतर सचिन गुप्ताने दिग्दर्शनासाठी मदत केली. तर रिव्हर मार्चने गाणं तयार केलं. फुकटात गाणं तयार केलं. त्या गाण्यात कोळी समाज आणि डब्बेवाले आले. ते एक पैसा न घेता आले. मनात आलं असतं तर शाहरुख आणि सलमानलाही घेतलं असतं, असंही अमृता फडणवीस म्हणाल्यात.

तर आज सकाळीच नवाब मलिक यांनी सकाळीच पत्रकार परिषद घेत ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटकेत असलेला जयदीप राणा तसेच एनसीबी ऑफिसमध्ये ये-जा असणारा नीरज गुंडे या दोघांचेही फडणवीस यांच्याशी जवळचे संबंध आहेत, असा खळबळजनक आरोप मलिक यांनी केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here