अमरावतीचे PSI अनिल मुळे यांच्या आत्महत्यानंतर ऑडिओ क्लिप व्हायरल…क्लिप मध्ये खळबळजनक संभाषण…

अमरावती – फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) अनिल मुळे यांची काल खळबळजनक संभाषणाची क्लिप व्हायरल झाली त्याच्या नातेवाइकांनी हि क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल केली असून या क्लिप मध्ये अनिल मुळे यांनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून मुळेंनी आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे. आत्महत्या करण्यापूर्वी केलेल्या संभाषणाची ऑडिओ क्लीप समोर आली आहे.

अमरावती | दोन दिवसांपूर्वी PSI अनिल मुळे यांनी फेसबुकवर अशी पोस्ट केली…

वरील क्लिप मध्ये हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या त्यांचे नातेवाईक आहेत त्यांचा अनिल मुळे सोबतचा संवाद ज्या मध्ये मुळे यांनी वरिष्ठावर आरोप केले आहेत.

याबाबत फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांच्याशी संपर्क साधला असता सर्व आरोप फेटाळून लावत त्यांनी आपण अनिल मुळे यांना तीनदा संधी दिल्याचे बोलले.

अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे PSI पदावर कार्यरत पोलीस अधिकारी अनिल मुळे यांची गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 12 तारखेला दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली या घटनेने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात खळबळ उडाली होती.

अनिल मुळे हे सुरुवातीला दोन महिने वैद्यकीय रजेवर होते त्यानंतर सतत चार महिन्यांपासून ते गैरहजर आहेत. कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची छाप असुन सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांची वेगळी ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे. याचा अधिक तपास नांदगाव पेठ पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here