अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील तळेगाव शेतशिवराच्या परिसरात रात्री एका आदिवासी महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.आधी बलात्कार आणि नंतर या मजूर महिलेची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.हत्या झालेल्या महिलेची ओळख पटू नये यासाठी चेहऱ्यावर दगडाने वार केले असून महिलेच्या गुप्तांगात देखील जखमा झाल्या आहे..
गावातील पोलीस पाटीलाच्या शेतात हा मृतदेह पडून होता त्यानंतर पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत महिलेची ओळख पटवली आहे प्रगती धुर्वे वय४०ही रा.नजरपूर मध्यप्रदेश येथील महिला आहे तर अद्यापही आरोपीचा शोध लागला नाही, त्यामुळे घटनेचा तपास पोलीस करीत आहेत,तर या घटनेनंतर जिल्हात खळबळ उडाली आहे तर हा मृतदेह गेल्या दोन दिवसांपासून पडून असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हत्या झालेली महिला ही वीटभट्टी वर काम करणाऱ्या निलेश मेश्राम याच्या सोबत अनेक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशन मध्ये राहत होती.पोलीस त्यांच्या कडे चौकशीसाठी गेले असता तो सुद्धा योग्य माहिती पोलिसांना देत नव्हता.सोमवारी ती घरातून शेण आणायला गेली असे त्याने पोलिसांना सांगितले.त्यावेळी या महिलेची ओळख पोलिसांना पटली…
हत्या झालेल्या महिलेची ओळख पटू नये म्हणुन आरोपींनी दगडाने तिचे तोंड चेंदा मेंदा करून टाकले होते.ती महिला वीटभट्टी वर काम करायची ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्रभर वीटभट्टी व आजू बाजूच्या परिसरात कसून चौकशी केली.अखेर पहाटे ही महिला निलेश मेश्राम कडे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली…
बाईट:-केशव ठाकरे,पोलीस निरीक्षक शिरखेड,