Amravati Update । हिंसाचाराच्या प्रकरणात अटक असलेल्या माजी मंत्री अनिल बोंडेसह इतर 13 जणांना न्यायालयाकडून जामीन…

अमरावतीत त्रिपुरातील कथित घटनेवरुन अमरावतीत मुस्लिम बांधवांकडून निषेध मोर्चात झालेल्या दगडफेकीच्या विरोधात रॅली काढल्याबद्दल भाजपने शहरात बंदचे आवाहन केले होते, दरम्यान शहरात जाळपोळ, जमावाकडून दगडफेक करण्यात आली होती. अनेक वाहनं, दुकानांचीही तोडफोड करण्यात आली होती. या घटनेला दोन्ही समुदायास जबाबदार धरत भाजपच्या मोठ्या नेत्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्याच बरोबर मुस्लीम समुदायातील कॉंग्रेसच्या नेत्यासह इतर जणांना पोलिसांनी अटक केली आहे…आतापर्यंत एकूण ५० आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना आज न्यायालयात हजर केले असता यातील 14 जणांना जामीन मिळाला आहे.

या दंगल प्रकरणी आज सकाळपासून अमरावती बंद मध्ये सहभागी झालेल्या भाजप नेत्यांच्या अटकेला सुरुवात झाली. यात भाजपच्या अनेक नेत्यांच्या घरांची पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली. माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनाही सिटी कोतवाली पोलिसांनी अटक केली. तसेच अन्य 50 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. हिंसाचार प्रकरणी 15 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आले.

भाजपचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे, शिवराय कुलकर्णी, भाजप प्रवक्ते, तुषार भारतीय, भाजप गटनेते, चेतन गावंडे, महापौर आणि अमरावती ग्रामीण भाजपच्या अध्यक्षा निवेदिता चौधरी तर दुसरीकडे मुस्लीम समुदायाचे मुस्लीम लीग चे मोहम्मद अश्रफी, कॉंग्रेस नेता आसिफ हुसेन सह जय संविधान संघटनेचे अडव्ह्केट अलीम पटेल यांनाही ताब्यात घेण्यात आले असून यांना अमरावती जिल्हा सत्र न्यायालय हजर केले असता प्रचंड गर्दी जमा झाली होती…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here