Amravati Update | शहरात संचारबंदी पर्यंत कायम…इंटरनेट सेवाही बंदच राहणार…अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग यांची माहिती

फोटो - पत्रकार परिषद घेतांना

अमरावती -शहरात हिंसाचाराच्या पाश्वभुमीवर अमरावती शहरात संचारबंदी लागू करून इंटरनेट सेवा बंद करण्यात आला आहे तर चार दिवसांपासून संचारबंदी व इंटरनेट बंद असल्याने आज अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयात अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग यांनी पत्रकारांशी संवाद साधला यात त्यांनी परिस्थिती पाहूनच संचारबंदीत हटवण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली तर इंटरनेट सेवा सुरू करण्याबाबतही त्यांनी जशी शहरात परिस्थिती राहील तस सर्व सुरळीत करू असेही त्यांनी सांगितले

दररोज हळूहळू वेळ वाढवली जाईल. परिस्थिती सामान्य झाल्यावर डॉ.आरती सिंह त्याचा आढावा घेऊन तो काढण्याचा निर्णय घेतील, असे अतिरिक्त पोलीस महासंचालक एडीजी (कायदा व सुव्यवस्था) राजेंद्र आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एडीजींनी पुढे माहिती दिली की 12 नोव्हेंबरच्या हिंसाचारात एकूण 11 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती आणि 13 नोव्हेंबरच्या हिंसाचारात एकूण 24 गुन्हे नोंदवण्यात आले होते. यामध्ये आतापर्यंत 188 आरोपींना अटक करण्यात आली आहे. शहर पोलीस आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरुच आहे.

नागरिकांनी पोलिसांना दिलेल्या सहकार्याचे कौतुक करून ही परंपरा पुढे चालवावी, शहर आपले आहे, परस्पर बंधुभाव जपला पाहिजे, असे सांगितले. आपसी दुरावा दूर झाला पाहिजे.पोलीस प्रशासन तुमच्या पाठीशी आहे. अफवांकडे लक्ष देऊ नका, जे लोक त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याकडे बळी पडतात. ते म्हणाले की, सध्या शहरात 2500 हून अधिक अधिकारी व कर्मचारी तैनात आहेत. SRP च्या 8 कंपन्या आहेत. अमरावती व्यतिरिक्त यवतमाळ, वाशीम, वर्धा, अकोला येथून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे.

हिंसाचाराच्या जखमा दूर करण्यासाठी पोलिसांकडून व्यापक प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले. जनजागृती केली जाईल. धार्मिक एकता प्रस्थापित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मोहल्ला किंवा विभागीय समितीच्या सतत बैठका घेतल्या जातील. रोज दोन तासांची सुट देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये नागरिक दूध, भाजीपाला किंवा जीवनावश्यक वस्तू खरेदी करू शकतात.ही सूट हळूहळू वाढवली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here