अमरावती | दोन दिवसांपूर्वी PSI अनिल मुळे यांनी फेसबुकवर अशी पोस्ट केली…

अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे PSI पदावर कार्यरत पोलीस अधिकारी अनिल मुळे यांची गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे. आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास शेगाव रहाटगाव रोड वरील महालक्ष्मी अपार्टमेंटच्या बाजूला असलेल्या खुल्या प्लॉटमध्ये घडली.

अमरावतीचे PSI अनिल मुळे यांच्या आत्महत्यानंतर ऑडिओ क्लिप व्हायरल…ऐका

घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी ते दोन दिवस अगोदर ११ तारखेला त्यांनी फेसबुक एक पोस्ट लिहली ज्यात त्यांनी लिहले ” नमस्कार मित्रांनो, माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे की, कोणीतरी माझ्या नावाने फेक आयडी काढली आहे. आणी तो लोकांना माझ्या नावाने पासे मागत आहे, कृपया सर्वांनी त्या फेक आयडी ला रिपोर्ट करावे. आनी कोणीही कसल्याही प्रकारचा पैश्याचा व्यवहार करू नये…आपलाच psi अनिल मुळे”

अनिल मुळे यांच्या वाल वरून

सदर पोस्ट हि ११ ऑगस्टला १२,२२ मिनिटांनी पोस्ट केली त्याअगोदर १२ वाजता त्याचं status update केलंय ज्या मित्रांना पैश्याची मागणी केली होती त्यांनीहि स्क्रीन शॉट टाकले त्यानंतर हा वरील खुलासा देण्यात आला. अनिल मुळे याचं फेसबुक शेवटची पोस्ट १३ ऑक्टोबर २०२० ला केलं होत. तब्बल १० महिने ते फेसबुक पासून दूर होते मात्र दोन दिवसांनी हि घटना घडली. वैद्यकीय कारण देत गेल्या दोन तीन महिन्यापासून सतत गैरहजर असलेल्या अनिल मुळे अस कोणत कारण होत ज्यामुळे आत्महत्येचा निर्णय घ्यावा लागला?…

शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास परिसरातील नागरिकांना अज्ञात व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी लगेच नांदगाव पेठ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी लगेच पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केला. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार अनिल मुळे हे सुरुवातीला दोन महिने वैद्यकीय रजेवर होते त्यानंतर सतत चार महिन्यांपासून ते गैरहजर आहेत. कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची छाप असुन सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांची वेगळी ओळख होती.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे. घरगुती वादाचे प्राथमिक माहिती येत असून तर आत्महत्येबाबत अनेकांना याबाबत संशय येत असून हि आत्महत्या आहे की हत्या?…याचा नांदगाव पेठ पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here