अमरावती | चोरी केलेल्या ७ मोटर सायकलीसह चोराला अटक…नागपुरी गेट पोलिसांची कारवाई…

दि. २८/०७/२०२१ रोजी पोलीस स्टेशन नागपुरी गेट अमरावती शहर अंतर्गत पोलीस आयुक्त आरती सिंह मॅडम यांचे मार्गदर्शनात आरोपी तासीम मुल्ला उर्फ जफर धुंवा उर्फ गुड्डु वल्द रफिक मुल्ला वय २६ वर्षे रा. कसाबपुरा, वलगाव ता.जि. अमरावती यांस संशयावरुन ताब्यात घेउन त्याची बारकाईने विचारपुस केली असता त्याने त्याचा साथिदार विधी संघर्षीत बालक याचेसह पो.स्टे. नागपुरी गेट व इतर पो.स्टे. हद्दीत केलेल्या ०७ मोटर सायकल चोरीची कबुली दिली

त्या ७ मोटर सायकल पैकी २ मोटर सायकली अकोला येथुन, २ मोटर सायकली बैतुल जिल्हा (म.प्र.) येथुन, २ मोटर सायकली आरोपी व त्याचा साथिदार विधी संघर्षीत बालक यांचे घरुन प्रत्येकी १ व १ मोटर सायकल इटारसी येथुन जप्त करण्यात आल्या असुन पुढील तपास सुरु आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस आयुक्त आरती सिंह मॅडम, मा. पोलीस उपायुक्त परी-१ श्री. विक्रम साळी साहेब, सहा. पोलीस आयुक्त गाडगे नगर विभाग अम. श्री. डुंबरे साहेब यांचे मार्गदर्शनात व.पो.नि. श्री. अर्जुन ठोसरे साहेब, पो.हवा. प्रमोद गुडधे, बबलु येवतीकर, पो.ना. अकील खान, विक्रम देशमुख, संजय भारसाकळे, आबीद शेख, शरद धुर्वे, म.पो.कॉ. निशा चौधरी, कविता सोळंके यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here