अमरावती | उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिक्षक उमेदवार पोहचले चक्क बनियानवर…वाचा कारण

अमरावती – विद्यार्थ्यांना शिकवणी व संस्काराचे धडे देणारे शिक्षक आज विभागीय आयुक्तलयात उमेदवारांच्या समर्थनार्थ नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी आले असता बेशिस्त वागताना दिसलेत तर कोरोनाचे संकट अजूनही सुरूच आहे हेही विसरलेत. आयुक्तलयाच्या आवारातच घोषणा सुरु होत्या यातच एक उमेदवार चक्क बनियानवरच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयूक्तलयावर पोहचले.

अमरावती शिक्षक मतदारसंघाची १ डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून आज उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सत्ताधारी पक्षांसह विविध पक्षांतून शिक्षक उमेदवारांनी आपला नामनिर्देशन अर्ज सादर केला आहे. मात्र गेल्या वीस वर्षांपासून शिक्षकांच्या समस्या अद्यापही पूर्ण झालेला नाही त्यामुळे जोपर्यंत शिक्षकांच्या समस्या मार्गी लागत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवार उपेंद्र पाटील हे चक्क बनियानवरच आयुक्तालयात दाखल झाले. त्यांना पाहण्यासाठी लोकांनी चांगलीच गर्दी केली होती

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात शिक्षक महासंघ, पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ,शिक्षक संघर्ष संघटना, राज्य शैक्षणिक सल्लागार समिती, विजुक्टा, महाराष्ट्र शिक्षक आघाडी आदी उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शाळा, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, जुनी पेंशन योजना अनुदानित शाळांप्रमाणे विना अनुदानित शाळा व तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रश्न या निवडणुकीतील मुख्य विषय असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here