अमरावती | तिवस्यात शिवसेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या…शहरात खळबळ

प्रज्योत पहाडे, तिवसा अमरावती

अमरावती- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तिवसा शहरातील आशिर्वाद वाईन बार समोर रात्री 10.30 वाजता अज्ञातांनी शिवसेनेचे तिवसा शहर प्रमुख अमोल पाटील यांची डोळ्यात मिरचीपूड टाकून हत्या केल्याची घटना घडली.. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे..

अमोल पाटील यांच्यावर या पूर्वी दोन हत्याचा आरोप होता.. तर त्याला दीड महिन्यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन वर्षासाठी जिल्ह्या बाहेर तडीपाराचा आदेश देखील काढला होता..ही हत्या अवैध धंद्यातुन झाली असल्याची सद्या चर्चा आहे..

मृतक अमोल पाटील व त्याचा एक मित्र बार बंद झाल्याने बार समोर बसला होत.., दरम्यान काही 2 ते 3 अज्ञात आरोपींनी अमोल पाटील यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याला जागीच ठार केले..घटनेची माहिती मिळताच लागलीच तिवसा पोलीस निरीक्षक रिता उईके यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.. तर यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होती..

मात्र अद्यापही आरोपीचा शोध लागला नाही.. राष्ट्रीय महामार्गावर वर्दळीच्या ठिकाणी राजकीय पदाधिकारी यांची हत्या झाल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न उपस्थित झाला आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here