अमरावती | विनापरवानगी मिरवणूका व मेळावे घेण्यास बंदी…कलम ३३ आणि ३६ लागू…

अमरावती, दि. 25 : महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 व 36 नुसार पोलीस आयुक्त यांना त्यांचे कार्यक्षेत्रातील जमाव व रस्त्यावरुन जाणाऱ्या मिरवणुका यातील व्यक्तींची वागणूक किंवा कृती यांचे विनियम करणे, सार्वजनिक करमणुकीवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार आहेत. त्या अनुषंगाने सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी पोलीस आयुक्त अमरावती डॉ. आरती सिंह यांनी खालील आदेश पारीत केले आहेत.

पोलीस आयुक्त यांच्या लेखी पूर्व परवानगीशिवाय सर्व प्रकारचे मोर्चे, मिरवणुका, मेळावे, धरणे, आंदोलने, शोभा यात्रा, धार्मिक दिंडी, रास्ता रोको व इतर कोणत्याही प्रकारच्या जमावास बंदी घालण्यात येत आहे. जर कोणाला असे कार्यक्रम घ्यावयाचे असल्यास पोलीस आयुक्त यांच्याकडे तसा लेखी अर्ज करावा.

पोलीस आयुक्त यांचे पूर्व परवानगीशिवाय क्रीडा विषयक सर्व स्पर्धा तसेच सार्वजनिक ठिकाणी आयोजित करण्यात येणारे सर्व मेळावे, रंगभूमीविषयक प्रयोग व इतर प्रयोग यांना पोलीस आयुक्त यांचे पूर्व परवानगीशिवाय बंदी घालण्यात येत आहे. क्रीडा स्पर्धा, मेळावे व प्रयोग यांचे आयोजनासंबंधी आयोजकांना लेखी अर्ज करणे आवश्यक राहील.
या संदर्भात काही आक्षेप असल्यास किंवा काही सुचना, हरकती असल्यास पोलीस आयुक्त, अमरावती यांना [email protected] या ई-मेल पत्त्यावर 30 दिवसाच्या आत सादर कराव्यात, असे पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here