अमरावती | डिझेल अभावी पोलिसांची वाहनं जाग्यावर उभी…

अमरावती जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनमधील सरकारी पोलीस वाहनं उभी आहे. मागील आठ ते दहा महिन्यापासून पंप चालकांचे पैसे न दिल्याने पंप चालकांनी पेट्रोल-डिझेल देणं बंद केल्याने ही वेळ आली आहे.. कोरोना मुळे पंप चालकांचे कोट्यवधी रुपये थकीत असल्याने पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोल-डिझेल देणं बंद केले आहे.

वरुड पोलीस ठाण्याची पोलीस व्हन गेल्या अनेक दिवसापासून बंद असल्याने आता पोलीस कसे काम करत असतील याचा विचार करण्यासारखी गोष्ट आहेसध्या अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 31 पोलीस स्टेशन मधील अनेक पोलीस वाहनं जाग्यावरच उभी असल्याने डिव्हिजन ग्रस्त बंद असल्याची माहिती आहे.

तर दुसरीकडे आवश्यकते नुसार वाहनात डिझेल भरणं सुरू आहे आणि तेही पोलीस कर्मचारी स्वतः स्वखर्चाने डिझेल भरत आहे.. तर अनेकांना वाहन कामपूरती फिरवा असे आदेश त्यांना देण्यात आल्याची माहिती मिळतेय.. आप-आपल्या हद्दीतच फिरण्याचे आदेश त्यांना दिले आहे..

पेट्रोल पंप चालक वरुड – तर काही पोलीस अधिकाऱ्यांनी पेट्रोल पंप चालकांना विनंती केली आणि लवकरच तुमचे थकीत रक्कम मिळेल असा विश्वास त्यांना दिलाय…
गृहविभागाने या बाबीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असून पंप चालकांचे थकीत पैसे द्यावे जेणेकरून पोलीस वाहनं पुन्हा ग्रसतीवर पडेल.. कारण ग्रस्त बंद पडली तर अवैध धंदे, चोरीचे प्रमाण वाढतील ज्याचा फटका हे सर्व सामान्यांना बसेल..

याप्रकरणी आम्ही पोलीस अधीक्षक डॉ हरि बालाजी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की ही अडचण आहेच पण आम्हाला डिसेंबर पर्यंतचं थकीत पैसे मिळाले असून ग्रस्त थोडी कमी झाली पण ती बंद नाही झाली अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here