अमरावतीच्या या पोलीस शिपायाला सिंघमपणा भोवला…पाहा व्हायरल व्हीडीओ…

न्यूज डेस्क – पोलीस कर्तव्य बजावत असतांना हातात पिस्तुल घेवून सिंघमपणा एका पोलीस शिपायाच्या चांगलाच अंगलट आला असून त्याला या प्रकरणी निलंबित केले आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार पोलिस स्टेशनमधे कार्यरत पोलिस शिपाई मंगेश मधुकरराव काळे (ब.क्र २४१३) यांनी पोलिस वर्दीमधे हातात पिस्तुल घेवुन, बाजीराव सिंघम सारखी डायलॉगबाजी करत, व्हिडिओ तयार केला आणि हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केला.

पोलीस शिपाई/२४१३ महेश मुरलीधरराव काळे, नेमणुक पोलीस स्टेशन चांदुर बाजार यांनी शासकीय गणवेषामध्ये हातात पिस्टल सारख्या शस्त्राचा वापर करुन व्हिडीओ तयार केला. तसेच सदरचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केला. यातुन आपण शासकीय गणवेषावर शस्त्राचा धाक दाखवल्याचे निश्पन्न होत आहे.
शासकीय गणवेषाचा आणि शस्त्राचा चुकीचा गैरउपयोग करुन सोशल मिडीयावर व्हिडीओ प्रसिध्द केला.

आपल्या या कृत्यामुळे पोलीस दलाची जनमानसात बदनामी होऊन पोलीसांची प्रतिमा मलीन झाली आहे. आपल्या कृतीचा ईतर पोलीस कर्मचारी व सामान्य नागरीक यांच्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारत येत नाही. आपण आपल्या कर्तव्यामध्ये अत्यंत बेशिस्त,बेजबाबदार व निष्काळजीपणा केलेला असल्यामुळे आपणास मुंबई पोलीस (शिक्षा व अपिल ) नियम १९५६ मधील नियम ३(१)(अ-२) मधील तरतुदीनुसार व पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २५(ख) नुसार आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासुन पासुन निलंबीत ” करण्यांत येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी,स्वियेत्तर सेवा आणि निलंबन,बडतर्फी व सेवेतुन काढुन टाकणे यांच्या काळातील प्रदाने ) नियम १९८१ चे नियम ६८ नुसार निलंबनाचा आदेश अस्तिवात असे पर्यंत आपणास अर्धपगारी बेतना इतका उदरनिर्वाह व त्यावर मिळणारे ईतर वेतन भत्ते अनुज्ञेय राहतील. निलंबनाचा आदेश अस्तिवात असे पर्यंत आपणास कोणत्याही प्रकारचा खाजगी उद्योग अथवा नोकरी करता येणार नाही. त्याबाबतचे निलंबन कालावधीमध्ये प्रत्येक महिन्यात तसे प्रमाणपत्र या कार्यालयास सादर करावे लागेल.

जर या कालावधीत कोणत्याही प्रकारचा खाजगी उद्योग आणी नोकरी केल्याचे निदर्शनास आल्यास आपणा विरुध्द महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणुक) नियम १९७९ च्या अंतर्गत शिस्तभंगविषयक कार्यवाहीस पात्र राहाल. निलंबनाचा आदेश अस्तिवात असे पर्यंत तुमचे निलंबनातील मुख्यालय हे पोलीस मुख्यालय, अमरावती ग्रामीण हे राहील. आपणास पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामीण यांचे पुर्व परवानगी शिवाय मुख्यालय, सोडता येणार नाही. निलंबन कालावधीत सकाळ-संध्याकाळ मुख्यालयी गणवेस हजर राहाणे अनिवार्य आहे.

सोर्स – सोशल मिडिया,व्हायरल व्हीडीओ…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here