न्यूज डेस्क – अमरावती जिल्ह्यात उद्या ५३७ ग्रामपंचायतीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे, यासाठी अमरावती जिल्ह्यातील 537 सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुक बंदोबस्त साठी पोलीस यंत्रणाही सज्ज आहे. तर आज अमरावती ग्रामीण येथील धारणी येथे निवडणूक बंदोबस्त करिता नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदाराचा मृत्यू झाला आहे.
आज अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे ग्रामपंचायत निवडणूक बंदोबस्तात जात असताना असताना हृदयविकाराच्या पोलीस हेड कॉस्टेबल यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
पोलीस हेड कॉस्टेबल किशोर देशमुख असे नाव असून बॅच नं ४५९ नेमणूक पोलीस मुख्यालय अमरावती ग्रामीण असून आज हे धारणी येथे ग्रामपंचायत निवडणूक बंदोबस्तसाठी जात असतानाच घाटात त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने दुखत निधन झाले आहे.