अमरावती । किरकोळ कारणावरून चक्क पोलीस गाडीच्या काचा फोडल्या…

न्यूज डेस्क – महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर असलेल्या सालबर्डी वरून काही नागरिक दशक्रिया आटोपून येत असताना अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहरात त्यांच्या वाहनाचा किरकोळ अपघात झाला. या अपघाताचा आढावा घेत असताना नागरिकांनी पोलिसांसोबत बाचाबाची केली.

सोबतच रोष व्यक्त करीत पोलिसांच्या गाडीच्या काचा फोडल्या.शहरात तणाव निर्माण न होऊ शहरात शांतता राहावी या उद्देशाने पोलिसांनी तातडीने ४ युवकांना ताब्यात घेतले. तर पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्या युवकाला बेड्या ठोकल्या आहेत.कायदा व सुव्यवस्था सुरक्षित राहावी या करिता पोलीस असतात मात्र दशक्रिया म्हणजेच दुःखद घटना घडली असताना पोलिसांशी हुज्जद घालणे हा प्रकार चुकीचा असल्याचं शहरामध्ये चर्चिला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here