Amravati | पोलीस ASI विजय अडोकर यांनी गळफास लावून केली आत्महत्या!…नातेवाईकांनी केला मोठा आरोप…

फोटो -सौजन्य सोशल मिडिया

अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलीस स्टेशन मधील कार्यरत पोलीस ASI यांनी आत्महत्या केल्याने अमरावती पोलिसात खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी बदली न केल्यामुळे माझ्या वडिलांनी आत्महत्या केल्याचा खळबळजनक जनक आरोप मृतकाचे पत्नी व मुलीने केला आहे..जोपर्यंत आयुक्तांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी कुटुंबियांची ठाम भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे..

अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असणारे विजय अडोकार यांनी आज सकाळी अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहाच्या मागे गळफास लावून आत्महत्या केली. मात्र आता ही आत्महत्या अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग वलगाव येथील ठाणेदार विजयकुमार वाकसे यांनी माझ्या वडिलांची बदली अमरावती येथे केली नाही आणि ठानेदार वाकसे यांच्या त्रासामुळे माझ्या वडिलांनी आत्महत्या केल्याचा आरोप मृत पोलीस विजय अडोकार यांच्या मुलींनी केला..

माझ्या वडिलांची तब्येत बरी नसताना आम्ही वारंवार डॉक्टरांचे पत्र सबमिट करूनही माझ्या वडिलांना त्रास होत होता.. त्यामुळे माझ्या वडिलांनी आत्महत्या केली..त्यामुळे जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही अशी ठाम भूमिका मृतकाच्या नातेवाईकांनी घेतली आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here