बडनेरा, अमरावती मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी नुकताच शिवसेना ही सुलतान सेना झाली असं वक्तव्य केलं या वक्तव्याच्या निषेधार्थ नागपुरी गेट परिसरात छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड च्या वतीने आमदार रवी राणा यांच्या पोस्टरला चपला मारत ,पोस्टर जाळून निषेध नोंदविण्यात आला.
नागपुरी गेट परिसरात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी. नुकत्याच झालेल्या 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाने रांना दाम्पत्यांना भरभरून मते दिली होती, मात्र आता हनुमान चालीसा मुद्द्यावरून राणा दांपत्य कट्टर हिंदुत्वाकडे वळल्याने आता अल्पसंख्याक समाजाकडून त्यांचा निषेध करण्यात आला…
त्याचबरोबर आमदार रवी राणा यांनी आज ओवैसींसह ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागले आहे. हनुमान चालिसा पठन केल्याने आम्हाला तुरुंगात टाकले जाते पण अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुले वाहतात. आता देशातील प्रत्येक हिंदुचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल आहे की, उद्याच्या सभेपूर्वी उद्धव ठाकरे हनुमान चालिसा वाचणार की औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणार? असा खोचक सवाल रवी राणांनी विचारला आहे.