अमरावती | क्रशरच्या धुळीमुळे शेतकऱ्याचं नुकसान…न्याय न मिळाल्याने उपोषण…

अमरावती जिल्ह्यातील जुना धामणगाव परिसरात क्रशरच्या धुळीमुळे लागून असलेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. या संदर्भात प्रशासनाकडे अनेक तक्रारी करून देखील ढिम्म प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नसल्याने अखेर वृद्ध शेतकऱ्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

विशेषतः ४ दिवस लोटून सुद्धा प्रशासनाने याची दखल घेतली नाही आहे. शासनाची कुठलीही परवानगी न घेता या क्रशरवर बास्टिंग केले गेले त्यानंतर त्यांनी परवानगी मिळवली असल्याचा आरोप देखील यावेळी शेतकऱ्याने केला. या हादर्यामुळे संत्रा झाडाचे मोठे नुकसान शेतकर्यांचे झाले आहे. त्यामुळे नुकसान भरपाईसह आक्षेप असताना परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी यावेळी शेतकऱ्याने केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here