अमरावतीच्या मालखेड आरोग्य केंद्रात धक्कादायक प्रकार घडला आहे. मालखेड आरोग्य केंद्रात आरोग्य सेवकाने कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या केली आहे. उमेश दिघाडे असे मृत आरोग्य सेवकांचे नाव आहे. उमेश गेल्या ९ वर्षापासून मालखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहे. ९ मे रोजी रात्री ९ वाजता दरम्यान उमेशने आरोग्य केंद्रात गळफास लावून जीवनयात्रा संपविली आहे.
आत्महत्या करण्याआधी उमेशने चिठ्ठीत किडनी स्टोन आणि उच्च रक्तदाब असल्याने आमहत्या करीत असल्याच नमूद केलं आहे. घटनेची माहिती मिळताच चांदुर पोलीस मालखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहचले आहेत. या संदर्भात अधिक तपास चांदुर पोलीस करीत आहेत.