अमरावती । फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांची तडकाफडकी बदली…

अमरावती शहरात वाढत्या खुनांच्या घटनेने शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे, यावर पोलिसांना गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यात अपयश येत आहे. यात सर्वाधिक खुनाच्या घटना फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत घडल्या असून यावर आवर घालण्यासाठी फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांची गुरुवारी रात्री उशिरा अचानक बदली करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे प्रभारी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांना देण्यात आला आहे. तर मेश्राम याना वायरलेस येथे बदली करण्यात आली आहे.

तर कालच फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या यशोदा नगरात गल्ली नं ४ येथे १७ वर्षीय युवकाची चाकूने वार करून निर्घुण हत्या करण्यात आली होती. तीन ते चार युवकांनी मिळून त्याची हत्या केली. गेल्या सहा महिन्यापासून आतापर्यंत फ्रेजरपूरा पोलीस हद्दीत झालेल्या हत्या या सर्व गुन्हेगारी क्षेत्रात असलेले गुंडप्रवृतीच्या लोकांच्या हत्या झाल्या आहेत. मात्र या हत्येने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here