अमरावती | फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे PSI अनिल मुळे यांची गळफास घेवून आत्महत्या !….

अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे PSI पदावर कार्यरत पोलीस अधिकारी अनिल मुळे यांची गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे.

अमरावती शहरात कालच दोन हत्याकांडाची घटना ताजी असतानाच आज पोलीस अधिकारी PSI अनिल मुळे यांच्या आत्महत्येने शहर हादरून गेलंय. अनिल मुळे हे कटोरा नाका,रिंग रोड परिसरात वास्तव्यास होते, त्यांच्या राहत्या घरापासून गोल्डन लिफ मंगल कार्यालया समोरील लेआऊट मधील निंबाच्या झाडाला गळफास घेवून जीवन यात्रा संपविली.

अमरावती | दोन दिवसांपूर्वी PSI अनिल मुळे यांनी फेसबुकवर अशी पोस्ट केली…

मिळालेल्या माहितीनुसार अनिल मुळे हे सुरुवातीला गाडगे नगर पोलीस ठाण्यात तर दुसऱ्यांदा राजापेठ पोलीस स्टेशन येथे तर आता फ्रेजरपुरा येथे कार्यरत होते. हे गेल्या दोन महिन्यापासून रजेवर होते, त्याचा घरगुती वाद असल्याचे समजते तर अनेकांना याबाबत संशय येत असून हि आत्महत्या आहे की हत्या?….याचा नांदगाव पेठ पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here