अमरावती | शेखर भोयर यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी…

न्यूज डेस्क – विधान परिषदेच्या निवडणुकीत अमरावती शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केलेले चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) हकालपट्टी करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवारी दिली आहे. या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन निवडणूक लढवत आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने कोणताही पाठिंबा दिलेला नाही. पक्षाची शिस्त भंग केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

पक्ष शिस्त मोडल्याप्रकरणी चंद्रशेखर भोयर यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली आहे, शेखर भोयर यांची शिक्षकांसाठी काम करणारी शिक्षक महासंघ नावाची शिक्षकांची संघटना असून यावेळी भोयर यांचे नाव चौरंगी लढतीत असल्याने या बंडखोरीचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना बसणार काय? हे निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच समोर येईल…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here