अमरावती | संचारबंदी आदेशात बदल…या सेवेला दिली मुभा

file photo

फाईल फोटो

अमरावती, दि. 3 : चष्म्याची, तसेच श्रवणयंत्राची दुकाने व सनदी लेखापालांची कार्यालये संचारबंदीच्या कालावधीत सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु राहू शकतील. तसा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज जारी केला.

आदेशानुसार, कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात 15 मेपर्यंत संचारबंदी आदेश लागू आहेत. जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

त्यानुसार अत्यावश्यक सेवेंतर्गत चष्म्याशी संबंधित असलेल्या सेवा व दुकाने, सनदी लेखापाल यांची कार्यालये, श्रवणयंत्र दुकाने व त्यासंबंधीच्या सर्व आस्थापना यांना संचारबंदी कालावधीत सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here