अमरावतीत जन्मलेला बॉलीवुड अभिनेता आसिफ बसरा यांची आत्महत्या !…

न्युज डेस्क – विदर्भाच्या मातीत अमरावती शहरात जन्मलेल्या बॉलीवुड अभिनेता आसिफ बसरा यांनी नैराश्यातून गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून चारित्र्य भूमिका करणारा चांगला अभिनेता गमावल्याने बॉलिवूड मध्ये दुखवटा पसरला आहे.

५३ वर्षीय बॉलिवूड अभिनेता असिफ बसरा गुरुवारी हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळेतील मक्कोडगंज येथील एका खासगी गेस्ट हाऊसमध्ये मृत अवस्थेत आढळला.

“अभिनेता असिफ बसरा हा धर्मशाळेत एका गेस्ट हाऊसमध्ये छताला लटकलेला आढळला. फॉरेन्सिक टीम घटनास्थळावर असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत,” एसएसपी कांगड़ा, विमुक्त रंजन यांनी एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार.

मृत्यूची कारणे शोधण्यासाठी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहचली आहे, असे पोलिसांनी सांगितले. आत्महत्या करून मृत्यू झाला की नाही याचा शोध घेण्यासाठी या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. तर प्राथमिक तपासणीनुसार बसरा नैराश्याने(suffering from depression) ग्रस्त असल्याचे उघड झाले आहे.

हा अभिनेता अनुराग कश्यपच्या ब्लॅक फ्रायडे आणि राहुल ढोलकियाच्या परझानिया या सिनेमात त्याच्या समीक्षकाच्या भूमिकांसाठी प्रसिध्द होता. अभिषेक कपूर दिग्दर्शित काई पो चे, जब वी मेट, हिचकी, वन्स अपॉन ए टाइम इन मुंबाई, क्रिश,एक खलनायक यासह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये तो दिसला होता.

नुकताच तो लोकप्रिय थ्रीलर वेब सीरिज ‘पाताल लोक’ मध्ये दिसला.चित्रपट निर्माता हंसल मेहता यांनी ट्विट केले की, “आसिफ बसरा! Can’t be true… This is just very, very sad.”

१९६७ मध्ये महाराष्ट्राच्या अमरावतीत जन्मलेल्या, बसरा १९८९ मध्ये आपल्या अभिनय कारकीर्दीसाठी मुंबईला गेले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here