अमरावतीचे भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांची ऑडिओ क्लिप नवाब मलिकांनी केली ट्वीट…

फोटो -सौजन्य सोशल मिडिया

न्यूज डेस्क – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळीच एक ट्विट केले, ज्यामध्ये अमरावतीचे भाजपचे नेते माजी आमदार डॉ. अनिल बोंडे यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिप मलिक यांच्या Twitter अकौंट वरून ट्वीट केली आहे. ज्यामध्ये ‘झूठ बोले कौआ काटे’ असे लिहलं आहे.

सदर Audio यामध्ये अनिल बोंडे कसं खोटं बोलतायत, ते पहा, असं मलिक यांनी म्हटलं. ऑडिओ क्लिपमधील मजकूर असा- ” गोंध्रा दंगलीनंतर गुजरात किंवा अहमदाबादमध्ये दंगल झालीच नाही. त्याआधी अहमदाबादमध्ये दरवर्षी दंगल ठरलेली असायची. पण मोदी सरकार सत्तेत आल्यापासून असे कृत्य झाले नाही. राज्यात फडणवीसांचं सरकार आलं, तेव्हाही दंगल झाली नाही.

भाजपचं सरकार जिथं असतं, तिथे दंगल घडवण्याची हिंमत कुणीही करत नाही. पण ज्या ठिकाणी सेक्युलर किंवा डाव्या विचारसरणीचं सरकार येतं, त्या ठिकाणी दंगली होतात. कारण अशा हिंसक कारवाया करणाऱ्यांना नेत्यांकडून संरक्षण मिळलं. याआधीच्या पाच वर्षांच्या सरकारमध्ये कोणत्याही संवेदनशील भागात दंगे झाले नाहीत. ” ही ऑडिओ क्लिप अनिल बोंडे यांची असून त्यांनी किती खोटं बोललंय, असा आरोप मलिक यांनी केला आहे.

यावर डॉ. अनिल बोंडे आज दुपारी पत्रकार परिषद घेत असून नवाब मलिकांनी केलेल्या प्रत्येक आरोपांच खंडन करणार आहे.

दरम्यान, अमरावती पोलिसांनी शहरात घडलेल्या दंगल प्रकरणी अनेक भाजप नेत्यांना अटक केली. यात माजी मंत्री अनिल बोंडे यांनाही अटक करण्यात आली होती. काल 17 नोव्हेंबर रोजी भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांनीही पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. मात्र हिंमत असेल तर ज्यांच्या घरात खरोखरच्या तलवारी आहेत, त्यांना अटक करून दाखवा, असं आवाहान अनिल बोंडे यांनी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना दिलं होतं. 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी झालेल्या हिंसक कारवायांमुळे सध्या अमरावती शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here