अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक गुटखा विक्री होत आहेत…यासाठी ग्रामीन पोलीसही सक्रीय झाले असून वरुड तालुक्या अंतर्गत येत असलेल्या बेनोडा शहीद या गावात पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे काल नाकाबंदी दरम्यान एका पांढऱ्या रंगाच्या महींद्रा स्कार्पिओ गाडीमध्ये अवैधरित्या गुटखा वाहतुक करताना आढळून आला असल्याने त्याच्यावर कारवाई केली आहे……
तर या गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा असून दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी नामे १.मो.शफिक मो.रशीद वय ३५ वर्ष व
अफसर खान गुलशेर खान वय ४० वर्ष याला ताब्यात घेतले असुन
त्याच्या कडून सुगंधित गुटखा ,स्कार्पियो गाडीसह एकूण ९३८४६० रु चा माल जप्त करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला. पुढील तपास ठाणेदार मिलींद सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप श्रीराव ,ए एस आय दिलीप वासंनकर,दिवाकर वाघमारे एनपीसी संतोष औंधकर पो. कॉ. अंकेश वानखडे सचिन भोसले करीत आहे….