अमरावती | देशी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणारा व विक्री करणारा अटक…गुन्हे शाखा यांची कारवाई…

अमरावती शहरात देशी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणारा व विक्री करणाऱ्याला अमरावती गुन्हे शाखेने कारवाई केल्याची घटना रात्री घडली असून शोएब खान ऊर्फ दिल्ली वाहेद खान वय 23 वर्ष असे देशी कट्टा विक्री करणाऱ्याचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दिनांक 12/01/2022 रोजी पोलीस आयुक्तालय हद्दीत रात्री दरम्यान पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, अन्सार नगर येथील शोएब दिल्ली हा अवैद्यरित्या विक्री करीता देशी बनावट कट्टा स्वतःजवळ बाळगून ग्राहकाची वाट पाहत आहे अशा प्रकारच्या माहितीवरुन सापळा रचून कार्यवाही केली असता शोएब
खान ऊर्फ दिल्ली वाहेद खान वय 23 वर्ष रा. अंसार नगर अमरावती यास अटक करुन त्याचे कडून एक देशी बनावटी कट्टा मॅगझीनसह किंमत अंदाजे 35,000 रुपये, एक एअर गन किंमत अंदाजे 3,000 रुपये व दोन जिवंत काडतुसे किंमत अंदाजे 2,000 रुपये असा एकुण 40,000 रुपयाचा अग्नीशस्त्रे जप्त करण्यात आले.

त्याबाबत पोलीस स्टेशन नागपुरी गेट येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्जुन बी. ठोसरे गुन्हे शाखा, अमरावती शहर यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राजकिरण येवले, HC राजेश राठोड, NPC निलेश जुनघरे, गजानन ढेवले, सैय्यद इम्रान व चालक प्रशांत नेवारे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here