अमरावती | जेवड नगरातील एका घराला आग…आगीत घरातील गृहउपयोगी साहित्य जळून खाक…

अमरावती च्या जेवड नगरातील एका घराला आग लागून आगीत घरातील गृहउपयोगी साहित्य जळून घाक झाल्याची घटना घडली आहे. शहरातील चिमोटे ले आऊट च्या मागे असलेल्या जेवड नगरातील केशवराव आत्माराम गोगटे यांच्या राहत्या घराला आज दुपार 12 च्या सुमारास घरातील इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट मुळे आग लागली .

या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले आहे, तर आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेजाऱ्यांनी आणि परिसरातील लोकांनी धावपळ करून आग आटोक्यात आणली. त्यात प्रामुख्याने फ्रिज, तसेच घरगुती साहित्य ,किराणा सोबतच काही पैसे जळल्याची माहिती मिळाली आहे.

सुदैवाने या आगीत कोणतेही जीवितहानी झाली नसून मात्र घरातील घरगुती जळल्याने कुटुंबावर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here