अमरावती | ST महामंडळात सेवापुर्व प्रशिक्षण पुर्ण झालेल्या १६२ उमेद्वारांना नियुक्ता अभावी उपासमारीची पाळी…

अमरावती – सरळ सेवा भरती २०१९ म.रा.प. महा. अमरावती विभाग मध्ये सेवापुर्व प्रशिक्षण पुर्ण झालेल्या १६२ उमेद्वारांना नियमित सेवेमध्ये अजूनही समाविष्ट केले नसल्याने आज जिल्ह्यातील उमेदवारांनी अमरावती जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत.

म.रा.प.म. सरळ सेवा भरती २०१९ ला अमरावती विभागामध्ये आमची अंतीम निवड होवून चालक तथा वाहक पदाचे सेवापुर्व प्रशिक्षण पूर्ण झाले असून त्यांना अद्यापही नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. गेल्या दोन वर्षापासून कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे ते बेरोजगार झाले आहोत त्यांच्या हाताला कुठेही काम नाही त्यामुळे आमची परिस्थिती अतिशय हलाखीची झाली आहे.

अशा परिस्थितीमध्ये कुटुंबाची उदरनिर्वाहाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. जबाबदारीमुळे फार ते सर्व मानसिक तणावातून जात आहोत. परिस्थिती लक्षात घेवून त्यांना येत्या १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत म.रा.प.म. अमरावती विभागामध्ये नियमित सेवेमध्ये रुजु करून नियुक्त्या दाव्यात व त्यांना न्याय मिळून द्यावा. असे निवेदनात म्हटले आहे.

तसेच विद्यार्थ्यांची दोन वेळा वैद्यकीय तपासणी झालेली आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या स्वखर्चाने ७० ते ८० हजार रुपये मध्ये कोरोनाच्या काळामध्ये प्रशिक्षण पुर्ण केले. या कारणामुळे काही विद्यार्थ्यांचे आई – वडील कोरोनाच्या कालावधी मध्ये मृत्यु पावले आहेत. तसेच काही जिल्ह्यामध्ये उदा. औरंगाबाद व नागपूर येथे नियुक्ती देण्यात आल्या आहेत.

तरी अमरावती विभागात विद्यार्थ्यांना नियुक्त्या का देण्यात आल्या नाहीत. तसेच काही विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पुर्ण झाले तरी एम.ओ. टेस्ट घेण्यात यावे व त्यांना सुध्दा नियुक्त्या देण्यात यावे. अन्यथा १५ ऑगस्ट २०२१ नंतर आम्ही म.रा.प.म. मध्ये निवड झालेले सुपर्ण उमेद्वार (चालक/वालक) जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती समोर आमरण उपोषण करु कारण त्याशिवाय आमच्याकडे काहीही पर्याय नाही आणि या उपोषणादरम्यान कुठल्याही (चालक/वाहक) उमेद्वाराला कुठल्याही प्रकारची हानी जिवाला धोका झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी ही महाराष्ट्र सरकार व म.रा.प. महामंडळाची असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here