डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न…

न्यूज डेस्क :- अमरावती : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीचे औचित्य साधून सिद्धार्थ वानखेडे मित्रमंडळाच्या सहयोगाने अमरावतीमधील टोपे नगर येथे १४ एप्रिल रोजी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

खऱ्या अर्थाने गरीब गरजू रुग्णांना मदत होऊन त्यांची आर्थिक बचत व्हावी या उद्देशाने रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्याचे ठरविले असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सिद्धार्थ वानखडे यांनी मनोगत व्यक्त करतांना स्पष्ट केले.या सेवेच्या देखरेखीसाठी ज्ञानेश्वर ईसळ यांची नियुक्ती करण्यात आली असून लाभ घेण्यासाठी ९८२३३६३७०८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमाला श्री.अशोक निसळ,वीरेंद्र जाधव,संजय नागोने,विनोद गाडे,शिवसेना उप महानगर प्रमुख विजय ठाकरे,मनोज बुंदेले,म्हस्के गुरुजी,आणि रुग्णवाहिका चालक ज्ञानेश्वर ईसळ आदींसह नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here