अमेझॉनचा मोठा विजय…रिलायन्सच्या फ्युचर रिटेलशी केलेल्या कराराला सर्वोच्च न्यायालयाने दिली स्थगिती…

फोटो- सौजन्य गुगल

न्यूज डेस्क – अमेझॉन-फ्युचर-रिलायन्स प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. रिलायन्स आणि फ्युचर रिटेल लिमिटेड (FRL) ला या प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. रिलायन्स आणि फ्युचर रिटेलच्या 24,713 कोटी रुपयांच्या सौद्याच्या बाबतीत, अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनने मोठी कमाई केली आहे. विलीनीकरणाच्या कराराला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सिंगापूरमधील आणीबाणी लवादाचा निर्णय भारतात लागू असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. आणीबाणी लवादाने हा करार थांबवला.

प्रसिद्ध फ्यूचर समूहाचे भारतातील काही किरकोळ आणि घाऊक किराणा व्यवसायातील मालकी हक्क रिलायन्स समूहाने विकत घेतले होते. तब्बल २४ हजार ७१३ कोटी रुपयांमध्ये हा व्यवहार झाला होता. मात्र, रिलायन्स आणि फ्यूचर समूहात झालेल्या या व्यवहाराला अमेझॉन कंपनीने विरोध केला होता. कारण फ्यूचर समूहाच्या एका कंपनीत अमेझॉनची ४९ टक्के मालकी आहे. त्यामुळे या व्यवहारानुसार जर कंपनी विकली जाते, त्यावेळी ती खरेदी करण्याचा अधिकार सर्वात आधी अमेझॉनचा ठरतो. पण, रिलायन्स-फ्यूचर करारात याचं पालन केलं गेलं नाही, असं अमेझॉननं म्हटलं होतं.

फ्युचर रिटेल व रिलायन्स रिटेल यांच्यामध्ये प्रस्तावित असलेल्या विलिनीकरणाला सिंगापूरस्थित न्यायालयानं स्थगिती दिली होती. या निर्णयाची अमलबजावणी करण्यात यावी, अशी याचिका अमेझॉनने केली होती. फ्युचर ग्रुपने आपला रिटेल, होलसेल, लॉजिस्टिक्स व गोडाउनचा व्यवसाय रिलायन्सला विकण्याचा करार केला होता. परंतु. तब्बल २४,७३१ कोटी रुपयांचा हा करार आपल्या फ्युचर ग्रुपशी झालेल्या कराराचा भंग करणारा असल्याचा दावा अमेझॉननं सिंगापूरमध्ये इमर्जन्सी आर्बिट्रेटरकडे केला होता. सिंगापूरच्या न्यायालयानं रिलायन्स फ्युचरच्या विलिनीकरणास स्थगिती दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here