बोदवड च्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखे त अमर डेअरीचे आठ लाख,चाळीस हजार लंपास…

चोर सी सी टीव्ही कॅमेऱ्यात कैद तपासात, पोलिसांची कसोटी…

बोदवड – गोपीचंद सुरवाडे

बोदवड येथील स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेशन रोडवरील शाखेत अमर डेअरी चा चालक उमेश रमेश महाजन रा जुनी पोस्ट ऑफिस गल्ली गणेश चौक बोदवड हा दि १७ रोजी सकाळी ११:४० वाजता, अमर डेअरी च्या कॉशियर ने भरणा करण्यासाठी नऊ लाख रुपये दिले असता उमेश रमेश महाजन त्याच्या जवळील एक पांढऱ्या रंगाच्या पिशवीत ६०००० हजार व दुसरी हिरव्या रंगाची पिशवीत ८,४०,००० हजार रुपये असे एकूण नऊ लाख रुपये होते.

त्यापैकी उमेश महाजन याने प्रथम काउंटर नं तीन वर पांढऱ्या रंगाचे पिशवीतले साठ हजार रुपये कॉशियर कडेदिले, दुसरीआठ चाळीस हजार रुपयांची बाकावर ठेवलेली हिरवी बॅग चोरट्याने बँकेतून लांबविलि याबाबत उमेश रमेश महाजन याने बोदवड पोलीस स्टेशन ला फिर्याद दिली आहे.

बोदवड स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून यापूर्वी सुद्धा अनिल खंडेलवाल यांची पन्नास हजार रुपयांची बॅग लंपास झाली होती, त्याचा तपास आजून लागलेला नाही यात पोलिसांची कसोटी लागणार आहे, या बँकेत सुरक्षा रक्षक असताना या पूर्वी सुद्धा रोकड लंपास झाले आहे. अधिक तपास बोदवड चे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here