किट्स रामटेक मधे माजी विद्यार्थ्यांचे संमेलन संपन्न…

रामटेक – राजु कापसे

किट्स रामटेक मध्ये नुकतेच माजी विद्यार्थ्यांचे संमेलन संपन्न झाले. गूगल मीट प्लेटफॉर्म वर संमेलनाचे ऑनलाइन उद्घाटन प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी संमेलन समन्वयक प्रा. मंगेश जैस्वाल, सर्व विभाग प्रमुख व 300 विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थी संमेलन मध्ये माजी विद्यार्थी व वर्तमान विद्यार्थी यांना आपले विचारांची देवान घेवान करन्याकरीता व मार्गदर्शन करण्याकरिता आमंत्रित केले जाते.

सत्र 2021-22 च्या विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थ्यांसी गूगल मीट प्लेटफॉर्मचा माध्ममातुन संपर्क साधला. प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी किट्स मधुन पुरविन्यात येणाऱ्या सोयी व सुविधाची माहिती दिली. त्यांनी किटस मध्ये असलेल्या सुविधांच्या विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याची विनंती केली.

गूगल मिट मध्ये सिव्हिलचा 1992 बैच चे विद्यार्थी अरशद खान, 2003 बैच ची पायल चाफले (बनकर), 1995 बैचचा अक्षय प्रदीप रणदिवे, मैकेनिकल इंजीनियरिंगचे डॉ. मनीष कुमार वर्मा, कंप्यूटर प्रौद्योगिकी विभागाचे मकरंद पंत, सूचना तकनीकी विभागाचे शुशांत महतो, इलेक्ट्रॉनिक्स व संचार अभियांत्रिकी विभाग, 2012 बैच चे इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंगचे अक्षय कुलकर्णी,

विद्युत अभियांत्रिकी विभाग 2013 चे अमोल गेडाम, वास्तुकला विभागाचे विभिन्न क्षेत्रातील 1997 बैच चे रंजीता जी., योगिता चौधरी, अमृता मुखर्जी, अर्चना पराटे, प्रतीक पुरकर, सचिन दुबे, संतोष खानजोडकर, इतिश यशवंत त्यांनी मार्गदर्शन केले. विभाग प्रमुख डॉ.सोहनलाल आत्मापूज्य, डॉ. विलास महात्मे, डॉ. यशवंत जिभकाटे, डॉ. पंकज आष्टनकर, डॉ. स्नेहल पाचपोर, कल्पना ठाकरे, सरोज शंभरकर सहित प्राध्यापकांनी कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here