मुर्तिजापुर – महाराष्ट्र राज्य इंडियन स्काउट्स आणि गाईड्स फिलोशीप जिल्हा अकोला च्या वतीने मुखाछदन चे वाटप. “हमारा कर्म हो सेवा , हमारा धर्म हो सेवा ” ची सदैव प्रार्थना आपल्या मुखात ठेवणारे व देशा प्रति,आपल्या प्रति तसेच इतरांन प्रति सदैव सेवा प्रदान करणारी
इंडियन स्काउट्स आणि गाईड्स फिलोशिप महाराष्ट्र राज्य अकोला जिल्ह्यातील पदाधिकारी व सदश्यायांनी विदर्भासह अकोला जिल्ह्यातील वाढता कोरोना या महामारी विरुध्द लढण्या करिता तसेच केंद्र व राज्य शासनाला सहकार्य करण्याचे प्रयत्न करीत अकोला

जिल्ह्यातील मूर्तीझापुर येथे राज्य अध्यक्ष विष्णू अग्रवाल, राज्य सचिव डॉ.अमोल कालेकर ,प्रतीक कु-हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय अधिकारीअभयसिंग मोहिते, मुख्याधिकारी न.प मूर्तीझापुर विजय लोहकरे जिल्हाध्यक्षा व न.प अध्यक्षा सौ. मोनाली कमलाकर गावंडे,विभागीय अध्यक्ष रविंद्र व्ही.खंडारे,
विभागीय सचिव विनोद भा. वानखडे, कमलाकर गावंडे यांच्या प्रामुख्याने उपाध्यक्षा सौ ममता कैलास महाजन ,जिल्हा सचिव संदिप सिरसाट, सह सचिव डॉ.तुषार बायस्कर,सौ भावना मॅकवाण, नाजूक घुमसे,प्रविण पालिवाल,विनय गि-हे, इन्व्हेलसिंग मुंणने नितीन वसंतराव शिंदे आदी सभासदांनी संपुर्ण शहरात कोरोना या महामारी विरुध्द जनजागृती करत शहरात मुखाछदन वाटप केले.