दोन महिन्याच्या बाळंतीनीला दोन मुलासह निराधार आश्रमात मिळाला आश्रय…तर आश्रम चालिका बनल्या आदर्श माता…

राहुल मेस्त्री

मत्तिवडे ता.निपाणी येथील अमर पवार आणि शुभांगी पवार या दांपत्याकडुन गेल्या दोन वर्षांपासून चालविण्यात येणाऱ्या भारतीय समाज सेवा निराधार आश्रमात आत्ता दोन महिन्यांच्या बाळंतीनीला आपल्या दोन मुलासह आश्रय मिळाला आहे..चार वर्षाचा मुलगा आणि दोन महिन्याची मुलगी अशी छोटी मुले आहेत.

निपाणी शहरातील जत्राट वेस नजीक संत रोहिदास चौक येथे एक महिला भटकंती करत होती.आणि आपल्या जिवाला कंटाळून आपल्या दोन बालकांना तिथेच सोडून जिव देण्याच्या प्रयत्नात होती..तोवर येथील काही महिलांनी त्या भटकंती करणाऱ्या महिलेला आणि तिच्या बालकांना घरी बसवून मत्तिवडे ता.निपाणी येथील भारतीय समाज सेवा निराधार आश्रम चालक अमर पवार यांना फोन करून त्या महिलेला आपल्या मुलासह निराधार आश्रमात पाठविण्यात आले.

गेल्या आठ दिवसापासून संकेश्वर ते निपाणी पर्यंत आपल्या दोन मुलासह भटकंती करणाऱी सदर बाळंतीन महिला पोटात अन्नाचा तुकडा पुरेसा नसल्याने अत्यंत अशक्त अवस्थेत होती..त्यामुळे दोन महिन्यांच्या मुलीला अंगावरचे दूधही मिळाले नव्हते.हे पाहुन आश्रम चालक अमर पवार यांच्या पत्नी शुभांगी पवार यांनी त्या दोन महिन्यांच्या मुलीला आपल्या अंगावरचे दुध पाजून समाजापुढे एका उत्तम मातेचा आदर्श ठेवला..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here