नॉमिनी अंगठे लावुन धान्य वितरणाची परवानगी द्या…

रास्तभाव दुकानदार संघटनेची एकमुखी मागणी
तहसिलदारांमार्फत जिल्हा पु. अधिकाऱ्यांना निवेदन

रामटेक – राजु कापसे

कोविड १९ महामारीने एकीकडे संपुर्ण देशात थैमान घातलेले असुन शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातही संक्रमितांसह मृतकांचा आकडा कमालीचा वाढलेला आहे तर दुसरीकडे अशा बिकट परिस्थीतीत स्वतःचा जिव धोक्यात टाकुन स्वस्त धान्य दुकानदार नागरीकांना धान्य वितरीत करीत आहे.

मात्र यातच भरीस भर म्हणजे धान्य वितरणासाठी प्रारंभी लाभार्थ्यांचे ई पास मशीनवर अंगठे घ्यावयाचे राहात असल्याने स्वस्त धान्य दुकानदारांना संक्रमणाचा मोठा धोका बळावला आहे. तेव्हा पुर्वीप्रमाणेच स्वस्त धान्य दुकानदाराला नॉमीनी ठेवुन धान्य वितरणाची परवानगी द्या अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने एका निवेदनातुन केलेली आहे.

याबाबतीचे नुकतेच एक निवेदन तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने स्थानिक तहसिलदारांमार्फत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेले आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक गावात विस ते चाळीस रुग्ण मिळत आहे.

निवेदनातुन रास्तभाव दुकानदार संघाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना कोवीड 19 चे संक्रमण कमी होई पर्यंत ई पास मशीनवर स्वस्त धान्य दुकानदारांना नॉमिनी अंगठे लावुन ग्राहकांना धान्य वितरणाची परवानगी देण्याची मागणी केलेली आहे. कोरोना संक्रमामुळे 3 महीना पासुन जनजिवन विस्कळीत झाले आहे स्वस्त धान्य दुकानदार हा लाभार्थी व शासन यातील कार्य करणारा दुवा असुन त्यांच्या माध्यमातून समाजातील गरीबांना कमी किंमती भावात धान्य वितरण केले जाते.

धान्य वितरण करतांना ई पास लाभाथ्यांना त्यांचे मसीनवर अंगठयाचे ठसे शासनाने नोंदविने अनिवार्य केले आहे. कोरोनाचा वाढत्या संक्रमणामध्ये दक्षता म्हणुण ई पास लाभार्थी येवजी नाॅमिनी म्हणुन पुर्वी प्रमानेच दुकानदारांना त्यांचे अंगठे नोदविण्यांची आणखी काही काळ मुद्दत देण्यांत यावी अशी मागणी यावेळी निवेदनातुन करण्यात आली. निवेदन देतेवेळी उपस्थितांमध्ये रामचंद्र अडमाची अध्यक्ष, राधेश्याम बरबटे, एन जी महाजन, महेश माकडे, रमेश मोहने आदी. उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here